Saturday, June 15, 2019

Father's Day ( बाबा👨‍👦♥️ )

Father's Day ( बाबा👨‍👦♥️ )

चाललोय धरून तुमचे हाथ
हाथ सोडला ना तुम्ही कधी
सुखदुःखाच्या उन्हामध्ये सुद्धा
दिली तुम्ही आम्हास प्रेमाची सावली

भीती वाटायची ना कधी की पडून जाऊन खाली
माहित होत आम्हास कि, मागे आहे अरुंद छाती
चुकाल तर शिकाल, पडाल तर उठाल
यशाची ही पहिली पायरी शिकवली होती बाबांनी

प्रेम आहे त्यांचं महान, प्रेमळ त्याचा स्वभाव
बेटा बाबा बाळा शिवाय बोलले ना ते कधी
बोलले ते नेहमी प्रेमाचे गान
बघून त्यांची प्रेमळ बोली शिकवली  मातृ भाषेचे भान
बाबा तुम्ही खरंच महान

पाखरांना पंख फुटले घेतली उंच भरारी
मुले बाळ झाली मोठी, मोठी झाली महत्वकांक्षा
छंद लागला जगाचा, छंद हा पैशाचा
दुर्लक्ष होतील आईबाबा, आईबाबा नवीन जगात

येईल वेळ असा बसलो असून दमून
आठवेल आईचं पदर, बाबांची सावली
भोगावे ते क्षण पुन्हा क्षण ते आनंदाचे
आईबाबा लाभले मला सौ भाग्य ह्या जीवनाचे...



 First step with father holding hand♥️



♥️Love you बाबूजी♥️



Father is First Identity in the World ♥️

3 comments:

Happy Rakshabandhan Tai

 जगाचं ठाऊक नाही पण  मला मोठा आधार आहे. पाठिंबा नको कुणा दुसऱ्याच... पाठीशी मोठ्या बहिणींचा हाथ आहे.. ताई म्हणुनी कुटुंबात जन्माला अस्सल ते ...